maharashtra

अस्तित्व लपवल्या प्रकरणी जिल्ह्यात तिघांवर गुन्हे


जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अस्तित्व लपवल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तिघांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

सातारा : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अस्तित्व लपवल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तिघांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 15 ऑगस्ट रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सालपे तालुका फलटण येथील पालखी हॉटेल येथे अक्षय देविदास शेलार वय 29 आणि शराफत अली शेख वय 25 दोघेही राहणार तळेगाव दाभाडे जिल्हा पुणे हे स्वतःचे अस्तित्व लपवून चोरीसारखा गुन्हा करण्याच्या उद्देशाने हातामध्ये लोखंडी रॉड व हेक्सा ब्लेड घेऊन पोलिसांची गाडी पाहून पळून जात असताना पकडले गेले आहेत. याबाबतची फिर्याद विठ्ठल बबन काळे व 47 यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दाखल केली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार पाडवी करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी चार वाजण्याच्या सुमारास वाठार स्टेशन येथील ओवी इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या पत्र्याच्या शेड जवळ पाठीमागे असलेल्या आवश्यक निलेश बबन बंडलकर वय 32, राहणार जेऊर (मांडकी), तालुका पुरंदर, जिल्हा पुणे हा अंधारात आपले अस्तित्व लपवून चोरी करण्याच्या उद्देशाने लपलेला आढळून आला. याबाबतची फिर्याद वाठार पोलीस ठाण्यात नितीन दत्तात्रय पवार वय 35 यांनी नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस नाईक आडके करीत आहेत.