maharashtra

सातारा जिल्हा बँकेचे कृषी व ग्रामीण विकासात मोठे योगदान : नितिन जाधव-पाटील


अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त बँकेचे अध्यक्ष नितिन पाटील यांच्या हस्ते आणि उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालिका सौ. कांचन साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, विविध विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक तसेच मुख्य कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व सेवक वर्ग यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण उत्साहपूर्ण वातावरणात झाले.

सातारा : भारतातील स्वातंत्र्य दिन प्रत्येक भारतीय नागरिकासाठी सर्वात महत्वाचा दिवस आहे. आपल्या देशाला ब्रिटीश राजवटीपासून दिनांक १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त बँकेचे अध्यक्ष नितिन पाटील यांच्या हस्ते आणि उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालिका सौ. कांचन साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, विविध विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक तसेच मुख्य कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व सेवक वर्ग यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण उत्साहपूर्ण वातावरणात झाले.
याप्रसंगी नितिन पाटील म्हणाले, देशाचे पावित्र्य आपण सर्वांनी राखलेच पाहिजे. संविधानाने दिलेले अधिकार व त्याप्रती आपली कर्तव्य जाणून घेऊन त्याचा आदर करणे तसेच लोकशाही बळकट करणेसाठी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी आवाहन केले. बँकेची प्रगती, नावलौकिक कायमच उंचावत जावा, अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली. लोकशाही मूल्य जपणारे सुसंस्कृतपणे राजकारण करणारे, कृषि औद्योगिक समाजरचनेची दिशा देणारे, ग्रामीण विकासाचा ध्यास असणारे आणि सहकारातून समृध्दी घडवणारे भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, आर .डी. पाटील, बाळासाहेब देसाई, आबासाहेब वीर अशा या थोर विभुतींचे माध्यमातून या बँकेची स्थापना झालेली असून त्यांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे. ७ दशकांच्या वाटचालीमध्ये बँकेची यशस्वीपणे घौडदोड सुरु असून चांगली प्रगती झाली आहे. नुकतेच नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय सहकार मंत्रालयामार्फत ग्रामीण सहकारी बँकांची राष्ट्रीय परिषदेमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 'एका दशकातील सतत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल' केंद्रीय गृह व सहकार मंत्री ना. अमित शहा यांच्या शुभ हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करणेत आला. स्थापनेपासून बँकेचे संचालक मंडळ प्रभावीपणे काम करत असून, त्याची ही प्रचिती आहे. देशपातळीवर 'एका दशकातील सतत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित होण्यामागे तसेच जिल्हा बँकेच्या यशस्वी वाटचालीत स्व. विलासकाका उंडाळकर, स्व. लक्ष्मणराव पाटील, स्व. सदाशिवराव पोळ, रामराजे नाईक- निंबाळकर आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील आणि सर्व माजी आजी संचालकांचेही योगदान असून त्यांच्या सर्वांगिण नेतृत्वामुळे जिल्हा बँकेची प्रगती होत असून, जिल्हा बँक देशपातळीवर नावलौकिक मिळवत आहे.  
या प्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या ग्रामीण विकासाच्या कार्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जिल्हा बँक योग्य पद्धतीने कार्यरत असल्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये बँकेचे उत्तम योगदान आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये तीव्र स्पर्धा असून सातारा जिल्हा बँकेने ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सुविधा उपलब्ध करून देणेसाठी कोअर बँकिंग प्रणालीचा उपयोग केला आहे. बँक ३१९ शाखा व ६४ एटीएम च्या माध्यमातून जास्तीतजास्त घटकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देत आहे. भारतीय राष्ट्रीय पेमेंट निगम (एनपीसीआय) च्या  युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) प्रणालीवर लिंक झालेमुळे ग्राहकांना भीम, गुगलपे, फोनपे, पेटीएम, फ्री चार्ज, जिओ मनी द्वारे खरेदी व्यवहार करणे, फोन बिल भरणे, लाईट बिल भरणे, मोबाईल रिचार्ज करणे, ई-कॉमर्स, रक्कम वर्ग करणे इत्यादि सेवा उपलब्ध झालेल्या आहेत. या सुविधांचा व योजनाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.