येथील करंजे पेठ येथे अज्ञात चोरट्याने घरातून सोन्याची चैन, पाकीट, मोबाइल असा ४१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील करंजे पेठ येथे अज्ञात चोरट्याने घरातून सोन्याची चैन, पाकीट, मोबाइल असा ४१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १३ ऑगस्ट रोजी १.४० ते २ वाजण्याच्या दरम्यान दीपक नानासाहेब फडतरे, रा. करंजे पेठ, सातारा यांच्या घरी शंकर जनार्दन गायकवाड, रा. कोकराळे, ता. खटाव हे रंगकाम करण्यासाठी आले होते. दीपक फडतरे हे पहिल्या मजल्यावर जेवण करण्यासाठी गेले असता गायकवाड यांनी सोन्याची चैन, पाकीट व मोबाइल असा ४१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


