धनगरवाडी, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने जबरदस्तीने मोबाइल चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : धनगरवाडी, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने जबरदस्तीने मोबाइल चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१४ ऑगस्ट रोजी २ वाजण्याच्या सुमारास धनगरवाडी येथे राहत्या घरी बबीतादेवी सतीश पासवान ही महिला झोपलेली असताना तिचा गळा दाबून अज्ञात चोरट्याने ५ हजार रुपये किमतीचा मोबाइल जबरदस्तीने चोरून घेण्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


