येथील औद्योगिक वसाहती मध्ये असणाऱ्या हॉटेल फुलोराच्या स्नॅक सेंटरमधुन २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी आदित्य यशवंत पिसाळ रा. खेड, ता. सातारा प्रसाद साखरे रा. सदरबाझार, सातारा यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सातारा : येथील औद्योगिक वसाहती मध्ये असणाऱ्या हॉटेल फुलोराच्या स्नॅक सेंटरमधुन २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी आदित्य यशवंत पिसाळ रा. खेड, ता. सातारा प्रसाद साखरे रा. सदरबाझार, सातारा यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.११ ऑगस्ट रोजी ४.३० वाजण्याच्या सुमारास सातारा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या हॉटेल फुलोरा स्नॅक सेंटरच्या ड्रायव्हरमधुन ५०० रुपये रोख व २ हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे सिगारेटचे बॉक्स चोरून नेल्याची तक्रार अक्षय नारायण सावंत राहणार बॉम्बे रेस्टॉरंट परिसर, सातारा याने सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.


