विजेचा धक्का बसून आंबवडे बुद्रुक, ता. सातारा येथील एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : विजेचा धक्का बसून आंबवडे बुद्रुक, ता. सातारा येथील एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१५ ऑगस्ट रोजी १२ वाजण्याच्या दरम्यान कुमार शामराव जाधव वय २७, रा. आंबवडे बुद्रुक, ता. सातारा याला राहत्या घरातील मीटरमधुन वायरचा शॉप लागल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची खबर आशिष श्रीरंग जाधव यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली.


