येथील करंजे पेठ परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची तक्रार शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील करंजे पेठ परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची तक्रार शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १३ रोजी ८.१५ ते दि. १४ रोजी ९ वाजण्याच्या दरम्यान सातारा येथील अनुसया चेंबर्स शेजारील रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम. एच. ११ एवाय ३६३९ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार अमोल बाबा लिंबकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.


