केसरकर पेठ, सातारा येथील एका घरातून सुमारे पंधरा हजार रुपये किंमतीच्या संसार उपयोगी साहित्याची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या तीन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकले.
सातारा पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकास युवकानं मारहाण केल्याची घटना कोरेगाव शहरात घडली. या युवकास पोलीसांनी अटक केली आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधींना पाच पानी पत्र लिहून पक्षाचा राजीनामा दिला असतानाच, आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय.
नकाशाचे अतिक्रमण केलेल्या व्यक्तीचे नोंद प्रकरण घेऊन ते मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना सातारा येथील नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील प्रमुख लिपिक शामराव शंकर बांदल वय ५२ रा. रामकुंड, पुष्प ज्योतिबा अपार्टमेंट, सातारा हे अलगद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
वाई, ता. वाई येथे नदीमध्ये पाय घसरून पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद वाई पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
शेंद्रे, ता. सातारा येथे मोकळ्या जागेत पार्किंग केलेला ट्रॅक्टर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
शाहूपुरी परिसरात असणाऱ्या माजगावकर माळ परिसरातील जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी पोलिसांनी ३७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली.
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.