माजगावकर माळ येथील जुगार अड्डयावर छापा
३७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; सात जणांवर गुन्हा
शाहूपुरी परिसरात असणाऱ्या माजगावकर माळ परिसरातील जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी पोलिसांनी ३७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली.
सातारा : शाहूपुरी परिसरात असणाऱ्या माजगावकर माळ परिसरातील जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी पोलिसांनी ३७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी अवैध धंदे व शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत. या अनुषंगाने शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालून संबंधितांवर कारवाई करा अशा सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. गुरुवारी दि.२५ ऑगस्ट रोजी माजगावकर माळ झोपडपट्टी परिसरात काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला दिली. पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता सात इसम जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाइल्स असा एकूण ३७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील सावंत यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. जुगार प्रकरणी सुरेंद्र लक्ष्मण खवळे वय ३८, सुरेश कुऱ्हाडे वय ४५, प्रशांत अनिल कोळी वय २४, निलेश दगडू गोंजारी वय ३७, विशाल सिताराम मोरे वय २०, अमोल रमेश वालेकर वय १९, हुसेन उमर शेख वय ७० सर्व रा. माजगावकर माळ सातारा या सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, पोलीस हेड कॉन्स्टेबल हसन तडवी, लैलेश फडतरे, पोलीस नाईक अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, स्वप्निल सावंत, सचिन पवार, सुनील भोसले यांनी सहभाग घेतला.


