maharashtra

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा


अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरानजीक असलेल्या एका उपनगरातील प्राथमिक शाळेत दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी स्वच्छतागृहाकडे जात असताना उमेश रमेश अवघडे वय 33 राहणार धनगरवाडी, कोडोली याने तिचा हात धरून विनयभंग केला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधितावर विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.