maharashtra

भूमापन अधिकारी कार्यालयातील प्रमुख लिपिक लाच लुचपतच्या जाळ्यात


नकाशाचे अतिक्रमण केलेल्या व्यक्तीचे नोंद प्रकरण घेऊन ते मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना सातारा येथील नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील प्रमुख लिपिक शामराव शंकर बांदल वय ५२ रा. रामकुंड, पुष्प ज्योतिबा अपार्टमेंट, सातारा हे अलगद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.

सातारा : नकाशाचे अतिक्रमण केलेल्या व्यक्तीचे नोंद प्रकरण घेऊन ते मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना सातारा येथील नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील प्रमुख लिपिक शामराव शंकर बांदल वय ५२ रा. रामकुंड, पुष्प ज्योतिबा अपार्टमेंट, सातारा हे अलगद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, नकाशाचे अतिक्रमण केलेल्या व्यक्तीचे नोंद प्रकरण घेऊन ते मंजूर करण्यासाठी प्रमुख लिपिक शामराव बांदल यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर विभागाने दि. २५ ऑगस्ट रोजी पडताळणी केली असता तक्रारीत तथ्य आढळले. त्यानंतर विभागाने आज दि.२६ ऑगस्ट रोजी सातारा येथील नगर भुमापन कार्यालयात सापळा लावला असता शामराव बांदल हे तक्रादाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना अलगद जाळ्यात अडकले. लाचेची रक्कम स्वीकारून बांदल यांच्या विरोधात रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस नाईक काटकर, पोलीस कॉन्स्टेबल येवले, भोसले यांनी सहभाग घेतला.