maharashtra

शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा


शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सागर कुंडलिक शेलार वय 30, राहणार म्हसवे, तालुका सातारा हे तुटलेल्या वायरच्या दुरुस्तीचे काम करीत असताना राज मनोहर देवकर राहणार शहापूर, तालुका सातारा याने येऊन लाईट बंद केल्याचा तर राग मनात धरून शेलार यांना मारहाण, शिवीगाळ तसेच दमदाटी केली. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक दळवी अधिक तपास करीत आहेत.