maharashtra

पाण्यात बुडून एकाचा मृत्यू


वाई, ता. वाई येथे नदीमध्ये पाय घसरून पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद वाई पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : वाई, ता. वाई येथे नदीमध्ये पाय घसरून पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद वाई पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २५ ऑगस्ट रोजी ४ ते १०.३० वाजण्याच्या सुमारास वाई, ता., वाई येथील परशुराम मंदिरा शेजारी असणाऱ्या कृष्णा नदीपत्रात सर्जेराव शंकर शेडगे वय ९२, रा. वसंत नगर, सोनगिरवाडी, ता. वाई पाय घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची खबर विजय गुलाबराव शेडगे यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली.