maharashtra

पोलीसाला मारहाण करणाऱ्या युवकाला अटक


सातारा पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकास युवकानं मारहाण केल्याची घटना कोरेगाव शहरात घडली. या युवकास पोलीसांनी अटक केली आहे.

सातारा : सातारा पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकास युवकानं मारहाण केल्याची घटना कोरेगाव शहरात घडली. या युवकास पोलीसांनी अटक केली आहे.
कोरेगाव शहरात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांच्यावर हा हल्ला झाला. या हल्ला प्रकरणी पोलीसांनी अक्षय लालासाहेब पवार या युवकाला पकडलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अक्षय याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान पीएसआय कदम यांना मारहाण करताना अक्षय समवेत आणखी एक युवक होता. तो घटनेनंतर पळून गेला. त्याच्यावर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.