फलटण शहर परिसरातून सुमारे बारा लाखांची तांब्याची तार चोरीस गेल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
निष्काळजीपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा शहराच्या पश्चिम भागामध्ये पर्यटकांसाठी पर्वणी ठरू शकणाऱ्या मंगळवार तळ्याने पुन्हा कात टाकली आहे. नगरसेवक वसंत लेवे यांनी स्वखर्चाने मंगळवार तळे जाळीबंद करून येथील जलस्त्रोताच्या शुद्धीकरणाची व्यवस्था केली होती.
महाविकास आघाडीने काढलेल्या अतिविराट महामोर्चाला 'नॅनो मोर्चा' म्हणून हिणवणार्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सातारा येथे शेलक्या शब्दात वाभाडे काढले.
सातारा जिल्ह्यात रविवारी २५९ ग्रामपंचायतीसाठी ९२६ मतदान केंद्रावर सदस्यपदासाठी ३ हजार ८९४ अन सरपंचपदासाठी २४२ जागावर ६४८ जणांमध्ये थेट निवडणुक झाली. यासाठी प्रत्यक्ष मतदान हे ८२ टक्के झाल्याचे ग्रामपंचायत निवडणुक विभागातून सांगण्यात आले.
पारगाव, ता. खंडाळा गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्याने आयडिया कंपनीच्या टॉवरसाठी लागणाऱ्या ५० हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या चोरून नेल्याची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
पोलिसांनी जिल्ह्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या दारू अड्डयांवर छापे टाकून देशी व हातभट्टी असा एकूण ५७ हजार २१० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
तुमचे नवीन एटीएम कार्ड आले आहे, जुन्या एटीएम कार्डचा नंबर सांगा असेच म्हणत अज्ञात इसमाने पुसेगाव, ता. खटाव येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाची सुमारे साडेपाच लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
पाटण, ता. पाटण येथून घरकाम करणाऱ्या एका महिलेने ३५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.