एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 17 डिसेंबर रोजी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास भाटमवाडी, तालुका कोरेगाव गावच्या हद्दीतील जमिनीच्या वादातून बाबुराव अण्णा जाधव रा. भाटमवाडी, ता. कोरेगाव यांना तेथीलच श्रीकांत वसंत जाधव, वसंत कृष्णा जाधव यांनी मारहाण केल्याची फिर्याद कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कुंभार करीत आहेत.


