मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कारचालकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कारचालकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 17 डिसेंबर रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास अनिल नारायणदास नेताजी रा. रुईकर कॉलनी, कोल्हापूर याने त्याच्या ताब्यातील कार क्रमांक एमएच 09 डीए 4706 ही भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून मलकापूर तालुका कराड गावच्या हद्दीत बेंगलोर- पुणे महामार्गावर चालत असलेल्या शंकर आनंदा कुंभार वय 71, रा. कुंभारगाव, ता. पाटण यांना जोराची धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नेताजी याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वरोटे करीत आहेत.