क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या संपूर्ण सुरक्षिततेचा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण आणि जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होते.
माण-खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल येथे उपचार सुरु आहे. गोरे यांच्यासह 4 जण त्या गाडीतून प्रवास करत होते.
आमदार जयकुमार गोरे यांचा फलटण शहरात असणार्या बाणगंगा नदीवरील पुलावरुन कार कोसळून अपघात झाला. या अपघातात त्यांच्यासह एक अंगरक्षक आणि दोन सहकारी गंभीर जखमी झाले. परंतु अशा परिस्थितीतही त्यांनी फोनद्वारे अपघाताची माहिती खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दिली.
मला फॉरेन फंडातून भरपूर पैसे मिळणार आहेत. तुम्हाला 100 कोटीचे कर्ज कमी व्याजदरात देतो, असे सांगून वेळोवेळी 40 लाख रुपये घेवून संदीप बाळू घोरपडे (रा. टाकेवाडी ता.माण) याने सातार्यातील एका डॉक्टरला गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. 15 दिवसातील अशी दुसरा घटना असून शाहूपुरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सतरा जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एमआयडीसी परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
हातास कापून घेतल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सुरूर, ता. वाई येथून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद भुईंज पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
उंदीर मारण्याचे औषध खाल्ल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी जिल्हा हिवताप कार्यालयातील कनिष्ठ लिपिक राहुल शंकरराव जगताप याला पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात आले असून त्याला आदेश अंमलबजावणी कालावधीत पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे येथील वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालयात हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत.