maharashtra

कोडोली येथील जुगार अड्ड्यावर छापा


कोडोली येथील जुगार अड्ड्यावर सातारा पोलिसांनी छापा टाकून तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

सातारा : कोडोली येथील जुगार अड्ड्यावर सातारा पोलिसांनी छापा टाकून तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोडोली येथून माहुलीकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला असलेल्या टपरीच्या आडोशाला सलीम हसन मुलाणी वय 52 राहणार कोडोली सातारा, विकास राहू काकडे वय 60 राहणार कोडोली सातारा, यासीन शेख राहणार गुरुवार परज, सातारा हे तिघे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 340 रुपयांचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.