maharashtra

वाईत अज्ञाताने केले दोन दुचाकींचे नुकसान


वाईत अज्ञाताने दोन दुचाकींचे नुकसान केल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : वाईत अज्ञाताने दोन दुचाकींचे नुकसान केल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 21 डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री राजकुमार अशोक भिसे वय 34, रा. रविवार पेठ, वाई यांच्या घराशेजारी लावलेली त्यांची टीव्हीएस कंपनीची दुचाकी क्रमांक एमएच 11 बीटी 25 62 हिचे अज्ञाताने सुमारे 30 हजार रुपयांचे नुकसान केले असून भिसे यांच्या वाड्यात राहणारे भाडेकरू राजाराम कुंभनाथ यादव यांची टीव्हीएस स्पोर्ट मोटरसायकल क्रमांक एमएच 11 बीएफ 4511 हिचे सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान केले आहे. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक कांबळे करीत आहेत.