अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 23 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जिहे, ता. सातारा गावच्या हद्दीत विजय नगर येथे सातारा-रहिमतपूर रस्त्यावर केतन कारंडे रा. पुसेगाव, ता. खटाव याने त्याच्या ताब्यातील शाईन मोटरसायकल क्रमांक एमएच 11 सीएफ 5374 वेगाने, अविचाराने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून संतोष रामचंद्र कदम वय 47 राहणार नहरवाडी तालुका कोरेगाव याच्या ताब्यातील दुचाकीस क्रमांक एम एच 11 सी एस 80 11 समोरून जोराची धडक देऊन संतोष कदम यास गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.


