सातारा जिल्हा परिषद मैदानाबाहेरून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : सातारा जिल्हा परिषद मैदानाबाहेरून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 18 डिसेंबर रोजी साडेसहा ते नऊ वाजण्याच्या दरम्यान जिल्हा परिषद मैदान सातारा येथील मेन गेट समोरून विशाल विठ्ठल माने वय 30 राहणार संगमनगर सातारा यांची बजाज कंपनीची दुचाकी क्रमांक एमएच 11 सीएक्स 4648 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पोलीस नाईक गुरव अधिक तपास करीत आहेत.


