maharashtra

फलटण बसस्थानकात चोरी

चोरट्याने महिलेचे एक लाख 68 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने केले लंपास

फलटण बसस्थानकात अज्ञात चोरट्याने एका महिलेचे एक लाख 68 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : फलटण बसस्थानकात अज्ञात चोरट्याने एका महिलेचे एक लाख 68 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 23 डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फलटण एसटी स्टँड जवळ असलेल्या बारामती एसटी स्टँड मध्ये छाया बाळासाहेब घनवट वय 52 राहणार सिडको, औरंगाबाद या सांगली -औरंगाबाद बस मध्ये चढत असताना तेथील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने घनवट यांच्या बॅगेतील छोट्या पर्समध्ये ठेवलेले एक लाख 67 हजार रुपये किमतीचे साडेसहा तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, चांदीचे पैंजण तसेच एक हजार रुपये रोख रक्कम असलेली पर्स चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक कदम अधिक तपास करीत आहेत.