Eknath Shinde Resigns as CM : मुख्यमंत्री एकनाख शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचा कार्यकाळ आज संपतो आहे. अशात शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे....
एकनाथ शिंदे यांनी शनिवारी तापोळा आणि दरे या दरम्यान नव्याने तयार होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली एकनाथ शिंदे यांनी शनिवारी तापोळा आणि दरे या दरम्यान नव्याने तयार होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस 8 फेब्रुवारी रोजी विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे कट्टर समर्थक अशोका कंस्ट्रक्शन चे प्रोप्रायटर संजय मोरे व सातारा केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
ळासाहेबांची शिवसेना सातारा शहर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा जिल्हा संपर्कप्रमुख निलेश मोरे यांनी मुद्रीत केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
कांदाटी खोरे निसर्गसंपन्न असून येथील पर्यटनवाढीसाठी स्थानिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या. त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल, याचा आराखडा तयार करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे स्वागत मंत्री शंभूराज देसाई यांनी सारोळा ब्रिज, शिरवळ जि. सातारा येथे पुष्पगुच्छ देऊन केले. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या आगमनावेळी जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस दलाकडून मुख्यमंत्री महोदयांना मानवंदना देण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील विकासाच्या मुद्द्यावर जिल्ह्याचे भूमिपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात शिवसेना सर्वत्र वाढविण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ठाम ग्वाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. मी शिवसेनेतच असून माझी कोणावरही नाराजी नाही, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
कराड शहराच्या विविध विकास योजनांवर चर्चा करण्यासाठी पालिकेतील सत्तारुढ यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष व गटनेते नगरसेवक राजेंद्रसिह यादव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
उद्योजक आणि शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाहीर पाठिंबा दर्शवत शिंदे गटात प्रवेश केला. या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील शिवसेनेला सुरुंग लागल्याचे मानण्यात येते.
चेन्नई येथे पार पडलेल्या पाचव्या युथ मुलींच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्हा आणि राजधानी स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू आर्या देवेंद्र बारटक्के हिने 54 ते 57 किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक घेऊन सातारा जिल्ह्याला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतले पहिले सुवर्णपदक मिळवून देण्याचा मान मिळवला.
आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात राज्य शासन कोठे ही कमी पडणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळ गावी दरे तांब (ता. महाबळेश्वर) येथे वाई पोलीस उपअधीक्षक कार्यालयाकडून नियमित पोलीस बंदोबस्त असल्याचे उपअधीक्षक डॉ शीतल जानवे-खराडे यांनी सांगितले.
लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर (मरळी) येथे उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभ आणि ध्वजाचे लोकार्पण नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई याची प्रमुख उपस्थिती होती.