लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. वेगवेगळ्या मतदारसंघांत आपली ताकत किती, याची जोजवणी या राजकीय पक्षांकडून केली जात आहे. त्यासाठी राज्यातील बडे नेते महाराष्ट्रभर फिरत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील काही नेते, विद्यमान आमदार विजयाचे गणित बघून सोईच्या पक्षात जाण्याची चाचपणी करत आहेत. असे असतानाच सध्या अजित पवार यांच्या राष्ट्...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहे. या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पक्षांनी आपली तयारी चालू केली आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची तातडीची बैठक आज मूंबईत होणार आहे. बैठकीसाठी सर्व आमदारांना पाचारण करण्यात आलं आहे. मात्र, आज बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवण्याची शक्यता आहे.
संपूर्ण जगात दमदार नेतृत्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. काहीही झालं तरी आपल्याला जिंकायचं आहे. उदयनराजे यांना निवडून द्या.. कामाचं आमच्यावर सोडा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मी परवाच एकत्र बसून जेवलो आहे. ते एखाद्या स्वीट डिशप्रमाणे आहेत. गोड माणूस आहेत, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. कोण संजय राऊत? असं म्हणत अजित पवार यांनी राऊतांवर हल्लाबोल केला होता. ’सामना’तील रोखठोक सदरातून संजय राऊतांनी अजित पवारांवर दबाव असल्याचं म्हणत, त्यांच्या भाजपसोबतच्या चर्चेवर भाष्य केलं होतं. त्यावर अजित पवारांनी आमची वकिली करु नका असं म्हटलं होतं. मग आजच्या पुण्यातील पत्रकार परिषदेत कोण संजय राऊत? असा प्रश्न विचारुन आपला संताप व्यक्त केला होता. त्यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते, आ. अजित पवार यांच्या पुतळ्याचा सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावरून कडेलोट करण्यात आला.
जरा आजूबाजूच्या फलटण, दौंड, इंदापूर तालुक्यात जाऊन बघा, तिथल्या आणि इथल्या परिस्थितीत किती फरक आहे? गेली दोन दशके फलटणची जनता राष्ट्रवादीला कौल देत आहे, पण चार वेळा सत्तेत असून ही राष्ट्रवादीला फलटण तालुक्याचा विकास करता आला नाही, अशी स्पष्ट कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.
साखर कारखान्यांच्या शिल्लक उसाचा प्रश्न मोठा आहे. यासंदर्भात साखर आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. कारखान्यांचे हंगाम संपत आले असले तरी नजिकचा ऊस तुटावा यासाठी रिकव्हरी लॉस व वाहतुकीचे अनुदान सरकारकडून दिले जात असून, ऊस उत्पादकांचा तोटा होणार नाही याची काळजी सरकार घेत असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
गावाच्या विकासात एकोपा व सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे. हे वाढे गावाने दाखून दिले असून गावात चांगल्या प्रकारे विकास कामे झाली आहेत. याचा आदर्श इतर गावांनी घेऊन गावातील गट-तट विसरुन व सर्वांच्या सहकार्यातून गावाचा विकास करावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
सातारा येथील विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे भूमीपुजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
आपल्या मंत्रीपदाचा आणि राज्य सहकारी बँकेच्या सत्तेचा गैरवापर करून अजितदादा, अशोक चव्हाण यासारख्या अनेक मंत्र्यांनी राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने गिळले. त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही. हजारो शेतकरी सभासदांची त्यांनी फसवणूक केली आहे.