भरतगावचे माजी उपसरपंच संभाजी चव्हाण वय 47 यांचे सोमवरी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले.
सातारा : भरतगावचे माजी उपसरपंच संभाजी चव्हाण वय 47 यांचे सोमवरी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुले जय, वैभव, भाऊ हर्षद, प्रशांत असा परिवार आहे.
संभाजी चव्हाण हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांचे शिक्षण नवी मुंबई येथे झाले. त्याने मुंबईत अनेक छोटे मोठे व्यवसाय केले पण त्यांचे मन रमले ते पत्रकारितेत. उत्तम शेती हा सुद्धा त्यांचा आवडता छंद होता. पत्रकारितेसोबत त्यांनी राजकारण, समाजकारण यांतही आपला ठसा उमटवला.
चार डिसेंबर रोजी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारासाठी वैद्यकीय यंत्रणेने प्रयत्नांची शिकस्त केली. सिव्हिल सर्जन डॉ. चव्हाण, डॉ. भोसले, डॉ. ससाणे, प्रतिभा हॉस्पिटलचे डॉ. संजय साठे यांनी अद्यावत उपचार करण्याचे प्रयत्न केले.