maharashtra

अजित शिंदे यांची पोलीस निरीक्षकपदी बढती


Ajit Shinde promoted as Inspector of Police
सातारा तालुक्यातील बसाप्पाचीवाडी या गावचे सुपुत्र असलेले, शिंदे हे २००१ मध्ये सैन्यात (सी.आर.पी.एफ.) भरती झाले. शिपाई म्हणून भरती झालेले शिंदे यांनी उर्वरित शिक्षण पूर्ण करून २०११ मध्ये खात्यांतर्गत परीक्षा दिली आणि ते पोलीस उपनिरीक्षक झाले.

सातारा : केंद्रीय राखीव पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणारे अजित आनंदराव शिंदे यांची पोलीस निरीक्षकपदी नुकतीच बढती झाली.
सातारा तालुक्यातील बसाप्पाचीवाडी या गावचे सुपुत्र असलेले, शिंदे हे २००१ मध्ये सैन्यात (सी.आर.पी.एफ.) भरती झाले. शिपाई म्हणून भरती झालेले शिंदे यांनी उर्वरित शिक्षण पूर्ण करून २०११ मध्ये खात्यांतर्गत परीक्षा दिली आणि ते पोलीस उपनिरीक्षक झाले. अतिशय शिस्तबद्ध आणि कर्तव्यप्रिय असलेल्या शिंदे यांना नुकतीच पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली आहे. शिंदे यांनी आजवर महाराष्ट्र, आसाम, बिहार, छत्तीसगढ या राज्यांमध्ये सेवा बजावली आहे. त्यांच्या पदोन्नतीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.