एकास मारहाण केल्याप्रकरणी एकावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी एकावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 जानेवारी रोजी संध्याकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास धोंडीराम आत्माराम जाधव वय 67 रा. जरेवाडी ता. कोरेगाव यांच्या घरात तेथीलच आकाश चंद्रकांत जरे याने अनाधिकाऱ्याने प्रवेश करून जुन्या भांडणाचा राग मनात धरून दारूच्या नशेत येऊन जाधव यांना तू माझ्यावर गुन्हा का दाखल केलास, असे म्हणत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जाधव यांच्या नातीसही धक्काबुक्की करत जमिनीवर ढकलून दिले. या घटनेची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक साळुंखे करीत आहेत.