प्लास्टिक पिशवी वापराबाबत बेकरी चालकास दंड
पालिकेच्या पाठकडून कारवाई : नागरिक, व्यापाऱ्यांनी पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन
नगरपालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने शुक्रवारी ११ रोजी शहरातील दुकानांमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली. तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याबाबत अन्य दुकानदारांना पालिकेच्या पथकाकडून सूचनाही करण्यात आल्या आहेत.
कराड : येथील नगरपालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने शुक्रवारी ११ रोजी शहरातील दुकानांमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली. तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याबाबत अन्य दुकानदारांना पालिकेच्या पथकाकडून सूचनाही करण्यात आल्या आहेत.
पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक विरोधी मोहीम राबवत शहरात अनेक दुकानांची तपासणी केली. यामध्ये बऱ्याच ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळला नाही. मात्र, जे व्यापारी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या ग्राहकांना देण्यासाठी वापरत आहेत. अशांवर या पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये एका बेकरी चालकास दंड करण्यात आला. तसेच अशा पिशव्यांवर बंदी असून त्या ग्राहकांना माल देण्यासाठी वापरू नयेत, अशा सक्त सूचना अन्य दुकानांना देण्यात आल्या.
शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर व सिंगल युझ प्लास्टिकवर बंदी घातली आहे. शहरात नगरपालिकेकडून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. तसेच नागरिक व व्यापाऱ्यांनी याचा वापर टाळून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी रमाकांत डाके व नोडल ऑफिसर रफीक भालदार यांनी केले आहे.