maharashtra

जिल्ह्यातील अवैध दारु धंद्यांवर धाडी


कोरेगावमधील बाजारपेठेच्या पुलाच्या पुढील बाजूस किरण तानाजी भंडलकर (वय २५, रा. दत्तनगर, कोरेगाव) याच्यावर कारवाई करुन २६ हजार रुपयांची देशी, विदेशी दारु जप्त केली.

सातारा : कोरेगावमधील बाजारपेठेच्या पुलाच्या पुढील बाजूस किरण तानाजी भंडलकर (वय २५, रा. दत्तनगर, कोरेगाव) याच्यावर कारवाई करुन २६ हजार रुपयांची देशी, विदेशी दारु जप्त केली. सातारा शहरातील जुना मोटार स्टँड येथील भाजीमंडईच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत अंजू बालाजी गौंड (रा. बुधवार पेठ, सातारा) हिच्यावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली. यात १ हजार रुपयांची ताडी जप्त केली. मुंढे, ता. कराड येथे गावच्या कमानीजवळ अमोल रघुनाथ कांबळे (वय ३६, रा. मुंढे) हा दारु विक्री करताना असताना कराड शहर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. कटगुण, ता. खटाव गावच्या हद्दीत पुसेगाव ते दहिवडी रस्त्याला हॉटेलच्या पाठिमागे दारु विक्री करणाऱ्या अमोल रघुनाथ अवघडे (वय ३६, रा. वाठार, ता. कोरेगाव, सध्या रा. पुसेगाव, ता. खटाव) याच्यावर पुसेगाव पोलिसांनी कारवाई केली.
काढणे, ता. पाटण येथे बौध्द वस्तीलगत दारु विक्री करत असताना कृष्णत निवत्ती नांगरे (वय ४५, रा. काढणे) हा ढेबेवाडी पोलिसांना आढळला. त्याला नोटिस पाठवली आहे. केंजळ, ता. वाई गाच्या हद्दीत राहत्या घरामागे अवैध दारु व्रिक्री करताना आढळल्याप्रकरणी संदीप पोपट सावंत (वय ५२) याच्यावर भुईंज पोलिसांनी कारवाई केली. खंडाळा गावच्या हद्दीत मच्छी मार्केटच्या शेजारील ओढ्यालगत विनोद काळू गायकवाड (वय ४३, रा. खंडाळा) हा दारु विक्री करत असताना खंडाळा पोलिसांनी कारवाई केली.
केळघर, ता. जावळी गावच्या हद्दीत जुने बसस्थानकाच्या पाठीमागे सतीश नामदेव आटोळे (वय ३५, रा. केळघर) हा दारु विक्री करत होता. त्याच्यावर मेढा पोलिसांनी कारवाई केली. येळीव, ता. खटाव येथे सनी गुंडा कराळे (वय ४४, रा. पुसेसावळी) हा दारु विक्री करत असताना औंध पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. सोनारवाडी- कोयनानगर येथील कोयनानगर ते हेळवाक रस्त्याच्या बाजूस झाडा-झुडपामध्ये गिरीधर दादू मोहिते (वय ४०, रा. गोषटवाडी, ता. पाटण) हा दारु विक्री करत होता. त्याच्यावर कोयनानगर पोलिसांनी कारवाई केली.