भाजपच्या समर्थ बुथ अभियानामध्ये सातारा जिल्ह्यात कराड दक्षिण मंडलाने उत्कृष्ट काम केले. याबद्दल वाई येथे पार पडलेल्या भाजपच्या सातारा जिल्हा कार्यकारिणी बैठकीत कराड दक्षिण मंडल टीमचा सत्कार करण्यात आला.
कराड : भाजपच्या समर्थ बुथ अभियानामध्ये सातारा जिल्ह्यात कराड दक्षिण मंडलाने उत्कृष्ट काम केले. याबद्दल वाई येथे पार पडलेल्या भाजपच्या सातारा जिल्हा कार्यकारिणी बैठकीत कराड दक्षिण मंडल टीमचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या हस्ते कराड तालुकाध्यक्ष पै.धनाजी पाटील ( काका) व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी अन्य पदाधिकारी उयस्थित होते.
दरम्यान, भाजपाच्या संघटनात्मक रचनेत बुथप्रमुख हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुखांच्या माध्यमातुन केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यत आपल्या माध्यमातून पोहचवतात. यापुढेही जिल्ह्यात अशीच कामगिरी व्हावी, अशी अपेक्षा भाजपा प्रदेश सरचिटणीस डाॅ.अतूल भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.