maharashtra

सातारा शहरातील हेडन कॅफेची आरपीआय च्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड


Hayden Cafe in Satara city vandalized by RPI workers
कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे करुन देणार्‍या कॅफेत सापडले आक्षेपार्ह साहित्य

सातारा : सातारा शहरात विविध ठिकाणी कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे सुरू होते. याबाबतची माहिती समजताच सातार्‍यातील कॅफेची आरपीआय च्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.
सातारा शहराच्या जवळ पुणे-बेंगलोर हायवे नजिक असणार्‍या हिडन कॅफे वर आरपीआय महिला आघाडी आठवले गटाच्या महिला अध्यक्ष पूजा बनसोडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकून कॅफे वर दगड फेक करून कॅफेच्या काचा फोडल्या. कॅफेमध्ये अल्पवयीन प्रीमियुगलांचे चाळे सुरू होते. प्रशासनाने सातारा शहरात कॅफेच्या नावाखाली सुरु असणार्‍या अवैध बाबींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आरपीआयने हेडन कॅफेवर दगडफेक करुन कॅफेची तोडफोड केल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. अनेकदा पोलीस प्रशासनाला निवेदन देऊनही पोलीस प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते, असा आरोप आरपीआय कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी पुढील कारवाई केली आहे.