maharashtra

दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा


हलगर्जीपणे कार चालून दुचाकीला धडक देऊन एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक सर्फराज इक्बाल शेख राहणार सावनेर गोडोली याच्यावर औंध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : हलगर्जीपणे कार चालून दुचाकीला धडक देऊन एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक सर्फराज इक्बाल शेख राहणार सावनेर गोडोली याच्यावर औंध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मौजे लाडेवाडी गावच्या हद्दीत पुसेसावळी ते घाटमाथा रोड दरम्यान घडली आहे.

मोटर सायकल स्वार भगवान सूर्यवंशी वय 46 राहणार लांडेवाडी तालुका खटाव हे लांडेवाडी गावातून विहिरीची मोटर बंद करून बजाज मोटरसायकल वरून पुसेसावळी ते घाट माथा रोड ने जात होते. त्यावेळी चवळी बाजूकडून क्रेटा कार वेगाने आली असता चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे मोटार चालवून दुचाकीला धडक दिली. यामध्ये सूर्यवंशी हे गंभीर जखमी झाले आणि त्यांच्या मोटरसायकलचे नुकसान झाले. संबंधित चालकाने पोलिसांना अपघाताबाबत कोणती माहिती न देता त्यांना थेट औषध उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र सूर्यवंशी यांचे कृष्णा हॉस्पिटल कराड येथे औषधोपचार चालू असताना 11 मार्च रोजी निधन झाले. यासंदर्भात संबंधित कारचालक याच्या विरोधात औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.