पाटण तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का
3.9 रिश्टर स्केल तीव्रता : चिपळूणसह कराड तालुक्यातही जाणवला भूकंप
पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसरात रविवारी 24 रोजी सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी सौम्य भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल असल्याची माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
पाटण : पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसरात रविवारी 24 रोजी सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी सौम्य भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल असल्याची माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
येथील कोयना धरणामुळे पाटण तालुक्यातील नवजा विभागाचा परिसर भूकंपप्रवण क्षेत्र बनला आहे. या परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के बसत असून ते पाटण, ढेबेवाडीसह कराड तालुक्यातील काही भागातही जाणवतात.
आज रविवारी जाणवलेल्या भूकंपाच्या धक्याची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल इतकी होती. याचा केंद्रबिंदू पाटण तालुक्यातील तनाली गावच्या पश्चिमेला 12 किलोमीटर अंतरावर होता. तर कोयना धरणापासून 12 किलोमीटर अंतरावर हा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची खोली 11.37 किलोमीटरवर होती. हा भूकंपाचा धक्का पाटण तालुक्यातील कोयनानगर, नवजा, पाटण, पोफळीसह चिपळूण तालुक्यातील काही गावांमध्ये जाणवला. तर पाटण तालुक्यातील मल्हारपेठसह कराड तालुक्यातील पश्चिमेकडील गावांमध्येही या भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे.