maharashtra

आर्थिक फसवणूक प्रकरणी चौघांवर गुन्हा


आर्थिक फसवणूक प्रकरणी चौघा परप्रांतीयांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : आर्थिक फसवणूक प्रकरणी चौघा परप्रांतीयांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 2 जून 2022 पासून सतीश नारायण चव्हाण राहणार एकंबे तालुका कोरेगाव यांना ऊसगाव हंगामासाठी 24 ऊसतोड मजूर पुरवण्याचे आश्वासन देऊन आणि त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने पाच लाख सात हजार रुपये आणि मोबाईल हँडसेट घेऊन त्यांना ऊस तोडणी मजूर न पुरवता व त्या पोटी घेतलेले पैसे परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी डेबा तेरसिंग चौहान, जगदीश दुडबे दोघेही रा. मोहन पाडवा जिल्हा बलवाडी मध्य प्रदेश, जुबानसिंग परमासिया राहणार झिरपण, राजेश ओलावे राहणार शेंदवा जिल्हा बडवानी या चौघांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.