maharashtra

ठाण्यात होणार मुख्यमंत्री कार्यालय


Chief Minister's office will be in Thane
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कशिश पार्क येथे मुख्यमंत्री कार्यालय, आयुक्त कार्यालय आणि शासकीय कृषी विभागाचे कार्यालय उभारण्यात येणार आहे.

ठाण्यात होणार मुख्यमंत्री कार्यालय

कशिश पार्क येथे प्रशासकीय इमारत असून याच इमारतीत ही कार्यालये होणार आहेत.

- या कामासाठी एकूण 4 कोटी 60 लाख इतका खर्च येणार आहे.

- कार्यालयाच्या अंतर्गत कामांसाठी तसेच संगणक प्रणाली, इतर कामासाठी ठाणे महापालिकेने निविदा काढली आहे.

- ही निविदा 3 मे पर्यंत स्वीकारली जाणार आहे..

- त्यामुळे यापुढे राज्याचा कारभार ठाण्यातून देखील होताना दिसणार आहे.