maharashtra

अपघात केल्याप्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा


अपघात केल्याप्रकरणी कंटेनर चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : अपघात केल्याप्रकरणी कंटेनर चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 मार्च रोजी दहा वाजण्याच्या सुमारास जयवंत बबन माने हे टाटा सुमो गाडी क्रमांक एमएच 11 एबी 194 मधून सांगलीकडे निघाले असताना सातारा गावच्या हद्दीत जॉन डीअर ट्रॅक्टर शोरूम समोर अचानक पाठीमागून आलेल्या कंटेनर क्रमांक केए 51एएच 1580 वरील चालक गुरु स्वामी मुकक्या रा. कुमंदापूर, नालोर, तिरुअनंतवेली, राज्य तामिळनाडू याने पाठीमागून धडक दिली त्यामुळे सुमो गाडीचे नुकसान झाले आहे. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.