maharashtra

अवैधरित्या दुचाकी जवळ बाळगल्या प्रकरणी एकावर गुन्हा


अवैधरित्या दुचाकी जवळ बाळगल्या प्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : अवैधरित्या दुचाकी जवळ बाळगल्या प्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी सातारा एमआयडीसीतील बिरोबा मंदिराजवळ मनोहर उर्फ सोन्या विठ्ठल भोसले रा. कारंडवाडी, ता. सातारा हा नंबर प्लेट नसलेली दुचाकी चालवताना आढळून आला. या मोटरसायकलच्या मालकी हक्काबाबत त्याने आतापर्यंत कोणतीही कागदपत्रे सादर केली नसल्याने त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार माने करीत आहेत.