अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी कार चालकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी कार चालकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २५ मार्च रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मिरगाव, ता. फलटण गावच्या हद्दीत सातारा-फलटण रस्त्यावर असलेल्या कोठलिंग मंदिराजवळ भरत दत्तात्रय अभंग रा. विडणी, ता. फलटण याने त्याच्या ताब्यातील कार क्र. एमएच 02 बीजी 3899 अविचाराने, भरधाव वेगाने चालवून सुनील हरिभाऊ निंबाळकर रा. लक्ष्मी नगर, फलटण यांच्या कार क्र. एमएच 11 एच 8317 हिला जोराची धडक दिल्याने निंबाळकर यांची गाडी मंदिरावर जाऊन आदळली. या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. तसेच गाड्यांच्या नुकसानी बरोबर मंदिराचेही नुकसान झाले आहे. याबाबतची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.