maharashtra

दोन घटनांमध्ये गळफास घेऊन दोन जणांची आत्महत्या


सातारा शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : सातारा शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 मार्च रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आशीर्वाद कॉलनी, अमर लक्ष्मी, संभाजीनगर, एमआयडीसी सातारा येथील राहत्या घराच्या टेरेस वरील पत्र्याच्या शेडच्या एंगलला रस्सीच्या साह्याने गळफास घेऊन रमेश मुकुटराव पवार यांनी आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, ओंकार दीपक साळवे रा. नटराज मंदिराशेजारी, वनवासवाडी, सातारा याने राहत्या घरी साडीच्या साह्याने सिलिंगला असलेल्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक भिसे करीत आहेत.