सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्हे दाखल असणार्या 23 जणांना 10 दिवसांसाठी तात्पुरते तडीपार करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोनि विश्वजीत घोडके यांनी दिली.
सातारा : सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्हे दाखल असणार्या 23 जणांना 10 दिवसांसाठी तात्पुरते तडीपार करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोनि विश्वजीत घोडके यांनी दिली.
तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये समीर कच्छी, मानाजी माने, लहु भोई, अल्लाउद्दीन शेख, मनोज राउत, भरत घाडगे, सचिन माने, अंकुश भोसले, भरत माने, शंकर देशमुख, जमीर मुलाणी, विनायक शिखरे, प्रल्हाद चिखले, तुषार कापसे, सतीश वाघमळे, किरण साबळे, शंकर चोरगे, जगन्नाथ गायकवाड यांच्यासह पाच महिलांनाही तात्पुरते तडीपार करण्यात आले आहे.
ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे व दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, अशांची यादी करुन पोनि विश्वजीत घोडके यांनी त्यांचे प्रस्ताव तयार करुन तहसीलदार यांच्याकडे पाठवले होते. त्यानुसार तहसीलदार यांनी ही कारवाई केली.