महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 26 मे 2022 रोजी बारा वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेचे आंघोळ करताना चे व्हिडिओ तिच्या दिराने तिच्या अपरोक्ष काढले. काढलेले व्हिडिओ व्हायरल करुन तिच्या पतीला नोकरीवरून काढून टाकण्यात येईल, बदनामी करीन, अशी धमकी देत संबंधित महिलेवर त्याने अत्याचार केला. संबंधित महिलेबाबत केलेला प्रकार त्याने तिच्या मुलीसोबतही करण्याचा प्रयत्न केल्यामुळे मानसिक धक्क्यातून संबंधित महिलेच्या पतीने औषध उपचाराच्या गोळ्या पाण्यात विरघळवून पिल्या. याप्रकरणी संबंधित दिरावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक डी. ए. दळवी अधिक तपास करीत आहेत.