maharashtra

चोरीच्या गुन्ह्यातील एक लाख 60 हजारांचा मुद्देमाल पुसेगाव पोलिसांकडून जप्त


पुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी व अन्य गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांनी चोरी केलेले काही मोबाईल व एक मोटारसायकल असा एकूण 1 लाख 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पुसेगाव पोलिसांना यश आले आहे.

पुसेगाव : पुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी व अन्य गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांनी चोरी केलेले काही मोबाईल व एक मोटारसायकल असा एकूण 1 लाख 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पुसेगाव पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, विविध गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांनी चोरी केलेले काही मोबाईल व एक मोटारसायकल बुध ता. खटाव येथील काही नागरीकांच्या वापरात असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळालेली होती. त्यानुसार पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदिप शितोळे यांनी विशेष पथक नेमूण या वस्तूंचा वापर करणाऱ्या संशयीतांची माहिती घेतली व अशा संबंधीत 15 संशयीतांकडून एकूण 14 मोबाईल हॅण्डसेट व एक मोटार सायकल असा एकूण 1 लाख 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.हस्तगत केलेली मोटारसायकल ही वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे हद्दीतून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधिक्षक अजय बोऱ्हाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक संदिप शितोळे, सहायक फौजदार सुधिर येवले, हवालदार दिपक बर्गे,सुनिल अबदागिरी, विजय खाडे, सचिन जगताप, पुष्कर जाधव, अशोक सरक,वैभव वसव यांनी सहभाग घेतला. दिपक बर्गे अधिक तपास करत आहेत.दरम्यान पुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ज्या लोकांचे मोबाईल चोरीस गेले आहेत किंवा हरविले आहेत त्यांनी पुसेगाव पोलिस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.