maharashtra

डिसेंबरमध्ये खात्यात 6100 रुपये येणार? लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार?


6100 will come in the account in December? Which schemes will benefit from Ladaki Bahin to PM Kisan?
महाराष्ट्र: महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर विविध योजनांची अंमलबजावणी पुन्हा सुरु होईल.

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळतो. केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान योजना, महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी सन्मान योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या तीन योजना महत्त्वाच्या आहेत. या योजनांद्वारे थेट खात्यामध्ये पैसे पाठवले जातात. डिसेंबर महिन्यात या योजनांचा लाभ दिला जाऊ शकतो. पीएम किसान सन्मान योजनेचा 19 वा हप्ता, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 6 वा हप्ता आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता देखील डिसेंबर महिन्यात जारी केला जाऊ शकतो. या तिन्ही योजनांचे लाभार्थी ज्या कुटुंबात असतील त्यांना डिसेंबर महिन्यात 6100 रुपये मिळू शकतात. 

6100 रुपये कसे मिळणार?  

केंद्र सरकारतर्फे देशातील पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेद्वारे तीन हप्त्यांमध्ये एका वर्षामध्ये 6 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. पीएम किसान सन्मान योजनेचा 19 वा हप्ता मिळू शकतो. त्याचे शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळू शकतात. याशिवाय राज्य सरकारनं केंद्राच्या योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना सुरु केली होती, त्या योजनेतून यापूर्वी शेतकऱ्यांना पाच हप्त्यांमध्ये रक्कम देण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात या योजनेचा सहावा हप्ता मिळाल्यास ते देखील 2000 रुपये असे एकूण शेतकऱ्याला किंवा शेतकरी महिलेला 4 हजार रुपये मिळतील. याशिवाय महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असल्यास तिला महायुतीच्या आदेशाप्रमाणं 1500 रुपयांमध्ये 600 रुपयांची वाढ केल्यास 2100 रुपये मिळतील, असे एकूण 6100 रुपये  लाभार्थी कुटुंबाला किंवा शेतकरी महिलेला 6100 रुपये मिळू शकतात. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार? 

महाराष्ट्र सरकारनं जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेनुसार पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये पाठवले जातात. महायुतीनं निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्क्म वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन महायुती सरकारनं पाळल्यास महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 2100 रुपये द्यावे लागणार आहेत. 

दरम्यान, या योजनांशिवाय राज्य सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून देखील युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी  बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये, आयटीआय आणि पदविका उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना 8 हजार रुपये तर पदवीधर असलेल्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसाठी 10 हजार रुपये दिले जातात