काल संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उसाने भरलेल्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर वर्धनगड घाटातील 200 फूट खोलीच्या दरीत पडल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालक जखमी झाला. कोरोगावकडे जाताना वर्धनगड घाटातील दुसऱ्या वळणावर उसाने भरगच्च भरलेल्या या ट्रॅक्टरचा डाव्या बाजूचा ॲक्सल तुटून चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रॉलीसह हा ट्रॅक्टर दरीत पडला. पण चालकाने अवधान दाखवून ट्रॅक्टरमधून उडी मारल्याने तो बचावला.
पुसेगाव : काल संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उसाने भरलेल्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर वर्धनगड घाटातील 200 फूट खोलीच्या दरीत पडल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालक जखमी झाला. कोरोगावकडे जाताना वर्धनगड घाटातील दुसऱ्या वळणावर उसाने भरगच्च भरलेल्या या ट्रॅक्टरचा डाव्या बाजूचा ॲक्सल तुटून चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रॉलीसह हा ट्रॅक्टर दरीत पडला. पण चालकाने अवधान दाखवून ट्रॅक्टरमधून उडी मारल्याने तो बचावला. उडी मारत असताना दुखापत झाल्याने त्यास कोरेगाव येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. हा अपघात पाहण्यासाठी घाटामध्ये बघ्यांची मौठी गर्दी झाली होती.
वर्धनगड घाटात उतरताना असलेल्या वळणांवर चालकांचा ताबा सुटून अनेक अपघात झालेले आहेत. या घाटात उस वाहतूक करणारे अनेक ट्रॅक्टर चालक क्षमतेपेक्षा जास्त उस लादून कसरत करत वाहतूक करत असतात.यामुळे ते स्वतः बरोबरच त्या रस्त्यावरुन येजा करणाऱ्या वाहन चालकांचा व प्रवाशांचाही जीव धोक्यात घालत असताता. क्षमतेपेक्षा अधिक उस भरलेलेी ट्रॉली ओढणे शक्य होत नसल्याने अनेक चालक ट्रॉली तशीच रस्त्यावर उभी करुन निघून जातात. अनेकदा पाठीमागील चाकांना दगडांचे आटण लावून घाट कसाबसा चढण्याच्या करामती हे ट्रॅक्टर चालक करत असतात. जागोजागी असे दगड अनेक ठिकाणी तसेच पडलेले असतात. कानठिळ्या बसतील एवढ्या मोठ्या आवाजात वाहने चालवताना रस्त्याच्या कडेने ट्रॅक्टर चालवण्याचेही आवधान त्याना नसते. तर मोकळ्या ट्रॉली घेऊन जाणारे अनेक चालक सुसाटपणे ट्रॅक्टर दामटत असतात. अशाप्रकारे धोकादायकपणे उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांवर संबंधीत खात्याने नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे अशा आशयाचे वृत्त नुकतेच दैनिक प्रभातमध्ये प्रसिध्द झाले होते. पण त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करुन या घाटातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या सुरक्षीततेकडे कानाडोळा केले जात आहे. या घाटात रामोशीवाडी येथे नवीन पुल तयार झाला असून हा पुल मुख्य रस्त्याला जोडण्याचे काम सुरु आहे. पण या पुलावरील रस्त्याची चढण फार मोठी असून भविष्यात ती अपघातांना निमंत्रण देणारी ठरणार का अशी शंका व्यक्त होत आहे. लातूर-सातारा रस्त्याचे धीमेपणाने सुरु असलेले काम व त्यामुळे घडणाऱ्या विविध अपघातांकडे ठेकेदार कंपनी दुर्लक्ष करत असल्याची चर्चा लोकांमधून व्यक्त होत आहे. ट्रॅक्टर अपघाताच्या या घटनेची नोंद पुसेगाव पोलिस ठाण्यात उशीरा झाली असून हवालदार आनंदा गंबरे तपास करत आहेत.