maharashtra

दारू अड्ड्यावर छापा


दारू अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकून दारूच्या बाटल्या हस्तगत करीत दोघांना नोटीस बजावली आहे.

सातारा : दारू अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकून दारूच्या बाटल्या हस्तगत करीत दोघांना नोटीस बजावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंगापूर, ता. सातारा गावच्या हद्दीत विजय मोहन भिसे यांच्या राहत्या घराच्या आडोशाला विजय मोहन भिसे आणि रामचंद्र राठोड व 54 राहणार अपशिंगे मिलिटरी तालुका सातारा हे दोघे अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून 2680 रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करीत या दोघांना नोटीस दिली आहे.