maharashtra

तुळशीच्या लग्नानंतर ' शुभमंगल ' ची लगबग होणार सुरु


After the marriage of Tulsi, 'Shubhamangal' will almost start
वंशाचा दिवा हवा म्हणून गर्भपातासारखे प्रकार समाजात सर्रासपणे होतात. मात्र, याचे भयंकर परिणाम आज समाजात पहायला मिळत आहेत. मुलांना लग्नासाठी मुली मिळणे अवघड झाले आहे. विशेष करून ग्रामीण भागात बेरोजगार व शेतकरी मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे अव़घड झाले आहे. यामुळे लग्न करून देण्याची ऐपत नसलेल्या कुटुंबातील मुलींना पैसे देऊन लग्न केली जात आहेत.

पुसेगाव :  दिवाळी सण झाल्यानंतर तुळशी विवाहाला प्रारंभ होतो. परंतु, गत दोन वर्षपासुन कोरोनाचे सावट देशावर पडले होते. त्यामुळे अनेक लग्नसमारंभ रद्द झाले. परंतु, यंदाच्या लग्नसराईत लग्नाळू तरुणांसाठी चक्क ६३ विवाह मुहूर्त असून 'शुभमंगल सावधान' साठी यापैकीच एखादा मुहुर्त साधण्यासाठी वर-वधू पित्याची व लग्नाळू तरुणांची लगबग सुरु होणार आहे. मे महिन्यात सर्वाधिक शुभ मुहूर्त असणार आहेत.
वंशाचा दिवा हवा म्हणून गर्भपातासारखे प्रकार समाजात सर्रासपणे होतात. मात्र, याचे भयंकर परिणाम आज समाजात पहायला मिळत आहेत. मुलांना लग्नासाठी मुली मिळणे अवघड झाले आहे. विशेष करून ग्रामीण भागात बेरोजगार व शेतकरी मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे अव़घड झाले आहे. यामुळे लग्न करून देण्याची ऐपत नसलेल्या कुटुंबातील मुलींना पैसे देऊन लग्न केली जात आहेत. जाती-पातीचा विचार न करता परजिल्ह्यातील मुलींना लग्नासाठी राजी केले जात आहे. संबंधित मुलीच्या कुटुंबाला पैसे देण्याबरोबरच लग्नाचा सर्व खर्च मुलाकडून केला जात आहे. इतकेच नाहीतर दाग-दागिनेही मुलीच्या अंगावर घातले जात आहेत. अशा पद्धतीने ऋण काढून लग्न सोहळे साजरे केले जात आहेत. मुलीच्या घटत्या जन्मदरामुळे आज ही परिस्थिती ओढावली आहे.
लग्नासाठी मुली मिळवून देण्यासाठी दलाल सक्रीय झाले आहेत. मुलीच्या सौदर्यानुसार व मुलांच्या गरज, ऐपतीनुसार नवऱ्या मुलीचे दर ठरवले जात आहेत. एक लाखापासून ते पाच लाखांपर्यंत नवरी मुलीच्या कुटुंबाला पैसे दिले जात आहेत. यामध्ये एजंट सांगतील तेवढे पैसे गरजवान मुलाला मोजावे लागत आहेत. यातील पैसे त्या मुलीच्या पित्याला मिळतात, कि मधील दलाल घेतात, हे गुलदस्त्यातच राहते. यातून फसवणुकीचे प्रकारही समोर आले आहेत.
लग्न जमवण्यासाठी अशीही युक्ती
शहरातील नवरा पाहिजे, असे बहुतांश तरुणींना वाटते. त्यामुळे गावात राहणाऱ्या मुलीचे लग्न जमविणे हे दिव्य ठरत असल्याने विवाहेच्छुक काही तरुणांचे पालक मुलांना काही महिने शहरात राहण्यासाठी पाठवत असल्याचे दिसते. खेडेगावात शिक्षणापासुन वैद्यकिय आणि अन्य सोयी सुविधांचा अभाव आहे. रोजगाराच्या संधीही कमी आहेत. त्यामुळे सुशिक्षीत तरुणी शहराला पसंती देत आहेत. पूर्वी शेतीतून चांगले उत्पन्न मिळत होते. मोठी शेतीही होती, मात्र आता या व्यवसायातही फारसा नफा मिळत नाही. वाढत्या कुटुंबामुळे शेतीचे तुकडे पडले आहेत. त्यामुळेही तरुणी गावापेक्षा शहराकडे आकर्षित होत असल्याचे दिसते. शहरातील नवरा पाहिजे, अशी अपेक्षा ठेवण्यात गैर काही नाही. गावात सुविधांचा अभाव आहे. भविष्याचा विचार करून तरुणी असा निर्णय घेत असाव्यात.
मुहुर्त
नोव्हेंबर -20,21,29,30.
 डिसेंबर -1,7,8,9,13,19,24,26,27,28,29.
जानेवारी- 20,22,23,27,29.
फेब्रुवारी- 5,6,7,10,17,19.
मार्च- 25,26,27,28.
एप्रिल-15,17,19,21,24,25.
मे- 4,10,13,14,18,20,21,22,25,26,27.
जुन- 1,6,8,11,13,14,15,16,18,22.
जुलै-3,5,6,7,8,9  या वरील ६३ मुहूर्तमध्ये अनेक लग्नाळूंचे शुभमंगल सावधान होणार आहेत.
- ओंकार जंगम बुध