शाहूपुरी पोलिसांनी जुगार प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.
सातारा : शाहूपुरी पोलिसांनी जुगार प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील भू-विकास बँक चौक परिसरातील पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या पानटपरीच्या आडोशास यशवंत प्रभाकर पवार रा. कोडोली, सातारा हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून 790 रुपये किंमतीचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल सावंत करीत आहेत.