प्रोफेशनल फोटोग्राफर शिवाय कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला शोभा नाही. फोटोग्राफर संघटनेच्या नेहमीच पाठीशी राहीन असे आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.
सातारा : प्रोफेशनल फोटोग्राफर शिवाय कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला शोभा नाही. फोटोग्राफर संघटनेच्या नेहमीच पाठीशी राहीन असे आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.
सातारा येथील पुष्कर हॉल मध्ये सातारा मिनी फोटो फेअर 2021 चे आयोजन करण्यात आले होते, यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले सातारा येथे पहिल्यांदाच अश्या प्रकारचे फोटो फेअर भरल्याने सातारच्या वैभवात भर पडली आहे, भविष्यातहि अश्याच प्रकारचे आणि याही पेक्षा मोठे फोटो फेअर भरवण्यात यावे. जिल्ह्यातील सर्व फोटोग्राफर एकत्र रहावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
यावेळी फोटोग्राफी महासंघाचे अध्यक्ष अभय कापरे, महासचिव सुनील कोरगावकर, जेष्ठ प्रेस फोटोग्राफर एम रमजू, महासंघाचे उपाध्यक्ष यशवंत खोजे, शकील शेख, सूर्यकांत पवार, गौरव पवार यांच्यासह मान्यवर व संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी फोटो फेअरमध्ये फोटोशॉप संदर्भात कुशल सोनी यांनी फोटोग्राफरांना मार्गदर्शन केले. तर या सातारा मिनी फोटो फेअर 2021 ला सातारा जिल्ह्यातील फोटोग्राफर सह सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर आणि कोकणातील फोटोग्राफरांनी भेट दिली. या कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे फोटोग्राफिक वेल्फेअर असोसिशन ऑफ सातारा यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.