वडील तसेच शंभर वर्षाच्या आजोबांच्या पालन पोषणाची जबाबदारी पार न पाडता त्यांना सातत्याने शिवीगाळ व मारहाण करणार्या मुलावर सातारा शहर पोलिस ठाण्यात जेष्ठ नागरिक पालन पोषण अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : वडील तसेच शंभर वर्षाच्या आजोबांच्या पालन पोषणाची जबाबदारी पार न पाडता त्यांना सातत्याने शिवीगाळ व मारहाण करणार्या मुलावर सातारा शहर पोलिस ठाण्यात जेष्ठ नागरिक पालन पोषण अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
समाधान नवनाथ चव्हाण वय 30, रा. महागाव, ता. सातारा असे त्याचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील नवनाथ आनंदा चव्हाण वय 65, रा. महागाव यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, वडील व आजोबास सप्टेंबर 2018 ते कालपर्यंत वेळावेळी त्याने पेन्शनच्या पैशाची मागणी करून कुटुंबातील सर्वांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करत त्रास दिला. तसेच शंभर वर्षांच्या आजोबांनाही मारहाण केल्याचे नवनाथ यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबातचा अधिक तपास सहायक फौजदार भोसले हे करत आहेत.